सातारा

सातारा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम, संपूर्ण घरपट्टी भरलेल्या सातारकरांना मोफत राष्ट्रध्वज

सातारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सातारा नगरपरिषदेमार्फत ज्या मिळकतधारकांनी 1 एप्रिल 2022 पासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे, त्यांना मोफत तिरंगा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सातारा नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी दिली.

ज्या नागरिकांनी 1 एप्रिल 2022 पासून आपली घरपट्टी भरलेली आहे त्यांनी सातारा नगरपरिषद सातारा मुख्य कार्यालय, नगरपरिषद कार्यालय सदरबझार, नगरपरिषद कार्यालय गोडोली, नगरपरिषद कार्यालय शाहुपुरी, नगरपरिषद कार्यालय विलासपूर येथून आपली घरपट्टी भरलेली पावती सोबत घेवून येवून राष्ट्रध्वज घेऊन जावेत व ज्यांना राष्ट्रध्वज विकत घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील ठिकाणी 25 रुपये भरुन राष्ट्रध्वज विकत घ्यावेत व येणाऱ्या 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रध्वज आपल्या मिळकतींवर फडकवावेत. तरी नागरिकांनी लवकरात लवकर मिळकतकर भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही कोडगुले यांनी केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago