crime
पुणे : कात्रज पोलीस चौकीत पोलीस उपनिरीक्षकाला एक महिला व तिच्या मुलाने मारहाण करून धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रीतम चुन्नीलाल परदेशी आणि त्याची आई सुजाता चुन्नीलाल परदेशी या दोन्ही आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम परदेशी आणि अक्षय पांडुरंग माळवे (वय २३) या अन्य व्यक्तीमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर प्रीतम आणि त्याची आई पोलीस चौकीत पोहोचले, तेथे त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक (PSI) नितीन तानाजी जाधव यांनी दोघांकडे जाऊन त्यांना शांतता राखण्याचा सल्ला दिला. मात्र, याचा राग येऊन प्रीतम परदेशी यांनी पोलीस अधिकार्यांच्या सूचनेला धमकी देऊन उत्तर दिले. तो म्हणाला, “तुला माहित आहे का मी कोण आहे? मी तुझी वर्दी उतरवीन. माझ्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तु या चौकीला नवीन आहेस, आधी माझी माहिती काढ.” असे म्हणत त्यांना जोरात ढकलून दिले. प्रितम याने त्याच्याकडील फुटलेल्या मोबाईलने त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार करुन त्यांना जखमी केले.
आरोपीची आई सुजाता परदेशी हिनेदेखील उपनिरीक्षक जाधव यांच्यावर शारिरीक हल्ला केला. तिने जाधव यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून ”तुझ्यासारखे बरेच बघीतलेत, तू काय करणार आमचे, माझा मुलगा पण प्रेसमध्ये आहे, त्याला सांगून तुझी नोकरी घालवते,” असे म्हणत शिवीगाळ केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक थोरात पुढील तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…