क्राईम

घर दाखवण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक

पालघर : घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आकाश विठ्ठल संकपाळ असं बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आकाश संकपाळ आणि पीडित महिला हे पालघरमधल्या नालासोपारा या ठिकाणी शेजारी राहतात. ते तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. २९ वर्षीय महिलेचं लग्न झालेलं असून ती तिच्या पतीसह आरोपीच्या घराशेजारी राहते.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाशने पीडित महिलेला घर दाखवण्यासाठी आपल्या घरी नेलं. तिथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे अश्लील फोटोही काढले. त्यानंतर आकाशने तिला धमकी दिली की याबाबत कुठे काही बोलशील तर तुझे फोटो व्हायरल करेन आणि तुझ्या नवऱ्याला ठार मारेन. धामी देत आकाशने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. दरम्यान, पीडित महिलेने हा सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी पोलीस ठाण्यात जाऊन आकाशच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरुन गुन्हा नोंदवून घेत आरोपी आकाशला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं, त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago