Heavy Rain in Pune city and district
पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं. आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पण बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने पेठांमध्ये सर्व भागांत पाणी साचले होते. ५० हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू होती. मदतीसाठी अग्निशामक विभागाच्या कार्यालयमध्ये सतत फोन सुरु होते. पावसात अनेक नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर त्याच दरम्यान शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याची घटना घडली. यामुळे पोलिसांना टेबलवर बसून काम करावं लागलं.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पत्रात ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सात वाजता सोडण्यात आला. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…