क्रीडा

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात

दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात केली आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला राजस्थानचा संघ १४८ धावांपर्यंत मजल मारु शकला.

नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉला जोफ्रा आर्चरने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर अजिंक्य रहाणेने आर्चरच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली, तो २ धावा काढत बाद झाला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शिखर धवन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

शिखरने ३३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्यानंतर श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. श्रेयस अय्यरही अर्धशतक झळकावत कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर आर्चरकडे झेल देत माघारी परतला. त्याने ५३ धावांची खेळी केली. यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत दिल्लीला मोठी धावसंख्या गाठून देण्याचा प्रयत्न केला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने ३, जयदेव उनाडकटने २ तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी १-१ बळी घेतला. दिल्ली कॅपिटल्सने सामन्यात १६१ धावा केल्या.

१६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामीवीर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर नॉर्जने जोस बटलरचा त्रिफळा उडवत दिल्लीला पहिलं यश मिळवून दिलं. कर्णधार स्टिव्ह स्मिथही रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन या दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाचं आव्हान कायम राखलं. बेन स्टोक्सने दिल्लीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत ३५ चेंडूत ६ चौकारांसह ४१ धावा केल्या. तुषार देशपांडेने बेन स्टोक्सला बाद करत दिल्लीला महत्वाची विकेट मिळवून दिली. स्टोक्सने ४१ धावा केल्या. यानंतर संजू सॅमसनही अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

रियान परागही रॉबिन उथप्पासोबत एकेरी धाव घेताना झालेल्या गोंधळात धावबाद होऊन माघारी परतला. मधल्या फळीत रॉबिन उथप्पा आणि राहुल तेवतिया यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतू नॉर्जने उथप्पाचा त्रिफळा उडवत दिल्लीला पुन्हा एक यश मिळवून दिलं. १९ व्या षटकात जोफ्रा आर्चरही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात अजिंक्य रहाणेकडे झेल देऊन बाद झाला, रबाडाने त्याचा बळी घेतला. दिल्लीकडून अॅन्रित नॉर्ज आणि तुषार देशपांडेने २ तर कगिसो रबाडा, आश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago