पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकड येथील उद्यानाचे उद्घाटन

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकड येथील तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ, माजी गृह राज्यमंत्री सचिन अहिर, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.

हे संगीत संकल्पनेवरील आधारित महाराष्ट्रातले पहिले उद्यान आहे. यामध्ये रंभा-सांभा, चांम्स्, स्टूल, ड्रम, टंग व डमरु असे संगीत वाद्य आहेत. ४८० चौरस मीटर आकाराचे पियानो सभागृह, लहान मुलांसाठी क्रीडांगण आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या जागेचे क्षेत्रफळ १० हजार चौरस मीटर आहे. ३ हजार ८५० चौरस मीटर क्षेत्रात लॉन असून परिसरात झाडे लावण्यात आली आहेत. जॉगिंग पथ आणि योगा सभागृहाची सुविधादेखील करण्यात आली आहे.

व्हेरॉक वेंगसरकर अकादमीतील पव्हेलिअनचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील थेरगाव गावठाण येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमीतील पव्हेलीअनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पवार यांनी पव्हेलीअनची पाहणी करून माहिती घेतली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago