पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळवडे येथील उद्यानाचे उद्घाटन

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील तळवडे येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यान व जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली.

तळवडे उद्यान अंदाजे १ एकरामध्ये विकसित करण्यात आले असून त्यामध्ये ३०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळण्या, खुली व्यायाम शाळा, लॅन्डस्केपिंग, फलोत्पादनविषयक कामे करण्यात आली आहेत. यावेळी आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे आदी उपस्थित होते.

इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री पवार यांनी भक्ती-शक्ती चौकातील इको जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन केले. ६ ते ८ मीटर रुंदी असलेले मातीचे जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आले असून वृक्षारोपण व लॉन तयार करण्यात आले आहे. सोबत खुली व्यायामशाळा व मुलांसाठी खेळण्याची जागा असणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

18 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago