महाराष्ट्र

प्रतिपालकत्व पोर्टलवर नोंदणीस इच्छुक पालकांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : अनाथ बालकांना दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. महिला व बालविकास विभागाने प्रतिपालकत्व पोर्टल तयार केले आहे. आजपर्यंत या पोर्टलवर दहापेक्षा अधिक पालकांनी नोंदणी केली असून याबाबत विभागामार्फत पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतिपालकत्वासाठी इच्छुक असणारे अनेक पालक जिल्हास्तरावर माहिती घेत आहेत. या पोर्टलला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, ही आनंददायी बाब आहे. प्रतिपालकत्व नोंदणीसाठी या पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अनाथ लेकरांना कुटुंबाची, आपल्या माणसांच्या प्रेमाची गरज असते. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतिपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार आहे. अनाथ बालकांना कुटुंब मिळवून देण्याच्या कामाइतके मोठे पुण्य नाही, असे मत मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

महिला व बाल विकास विभागाने अतिशय सुरक्षित आणि पारदर्शी असे Foster Care Registration Portal विकसित केले आहे. हे निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना त्यांचे हक्काचे क्षण, प्रेम, काळजी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी मदत होईल. इच्छुक पालक या पोर्टलवर प्रतिपालक म्हणून नोंदणी करू शकतात. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना आपुलकीने कुटुंबात समाविष्ट करून त्यांना प्रेमळ वातावरणात वाढण्याची संधी द्या आणि https://fc.wcdcommpune.com या संकेतस्थळाला भेट देऊन प्रतिपालक म्हणून नोंदणी करावी,असे आवाहन मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे.

प्रतिपालकत्व नोंदणी पोर्टल हे अर्ज भरण्यासाठी सुरक्षित व सुलभ आहे. “अर्जदार आणि विभाग यांच्या मधील दुहेरी प्रणालीच्या माध्यमातून सुलभ व जलद अर्जाची प्रक्रिया, शासकीय कार्यालयांना कमीत कमी भेटी, ऑनलाईन अर्जाची स्थिती, ऑनलाईन शंकानिरसन यंत्रणा, कालबद्ध निपटारा स्वयंचलित संदेश आणि ई-मेल यामार्फत अर्जाची स्थिती कळविण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago