महाराष्ट्र

इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याची मंत्रिमंडळ उपसमितीकडून पहाणी

गाझियाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा गती येताना पाहायला मिळत आहे. ही गती देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. याच उपसमितीने गाझियाबादमध्ये तयार होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याची पाहणी केली आहे.

इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळी उभारण्यात येणाऱ्या भव्य पुतळ्याची प्रतिकृती प्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांच्या टीमने तयार केली आहे. आज राज्य शासनाच्या समितीच्या वतीने या प्रतिकृतीची गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे जाऊन पाहणी केली. या 25 फुटी प्रतिकृती मध्ये एम.एम.आर.डी.ए. ने व आम्ही सुचवलेले आवश्यक बदल पूर्ण करून प्रतिकृतीस अंतिम मान्यता घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना यावेळी दिल्या. त्या वेळी समाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सह सचिव दिनेश डिंगळे यांसह विभागाचे अधिकारी व मान्यवर या दौऱ्यात उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago