छत्रपती संभाजी नगर

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला कोल्ड स्टोरेजसाठी निधी देऊ- फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे

औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक मंडळ अतिशय चांगले कामकाज करीत आहे. पाचोड येथील कोल्ड स्टोरेजच्या धर्तीवर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येत्या वर्षात निधी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी दिली.

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, औरंगाबाद व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या आग्रहास्तव उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत 20 ते 23 मे 2022 या कालावधीत मुख्य बाजार आवार, जाधववाडी, औरंगाबाद येथे आयोजित आंबा महोत्सावाचे उद्घाटन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भूमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

मंत्री भूमरे यांनी शेतकऱ्यांनी लावलेल्या स्टॉलला भेट दिली. प्रथम बाजार समितीचे प्रशासक कै. उदयराज पवार यांचे पंधरा दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर बाजार समितीचे मुख्य प्रशासक यांच्यावतीने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बाजार समितीने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाची स्तुती केली. समितीचे धर्तीवर कोकणामधील हापूस व मराठवाड्यातील केसर आंबा शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात प्रचार-प्रसिद्धी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केल्या जाईल, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फळबागेविषयी सविस्तर मागदर्शन केले.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक काळे यांनी प्रास्ताविक केले. बाजार समितीने उपबाजार आवारासाठी करोडी येथे 20 एकर जमीन संपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला आहे. त्यामुध्ये जिल्हाधिकारी यांनी सहाकार्य करावे, अशी मागणी काळे यांनी केली. आभार बाजार समितीचे अशोक शिंदे यांनी मानले.

उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार अंबादास दानवे, कल्याण काळे, कैलास पाटील, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एस.मोटे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे, मुरलीधर चौधरी, शिवाजी गावंडे, कृष्णा उकिर्डे, शिवाजी ढाकणे, शेख मोहंमद शेख चाँद, प्रकाश जाधव, गणेश नवले, अशोक शिंदे, मो. अबु सुफियान मो. गयास बागवान व कृषी पणन मंडळ, औरंगाबाद उपसरव्यवस्थापक जी.सी. वाघ तसेच बाजार समितीचे सचिव व्ही. ए. शिरसाठ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago