सोलापूर

मोठी बातमी! आमदार राम सातपुते यांच्या कारला अपघात, गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राम सातपुते यांनीच फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे.

आपल्या पक्षाची रोखठोक आणि आक्रमक पद्धतीने बाजू मांडण्यासाठी राम सातपुते यांची राज्यभरात ओळख आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. आज विविध कामांसाठी मतदारसंघात ते गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही.

अपघातानंतर राम सातपुते यांनी व्हिडिओ जारी करत म्हटलं आहे, “मतदारसंघातील प्रवासादरम्यान माझा अपघात झाला. यामध्ये गाडीचे तीन टायर फुटले. परंतु जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, आजपर्यंत माझ्या हातून जे काही पुण्य घडलं तसेच पांडुरंगाच्या कृपेने मी या अपघातातून सुखरूप बचावलो. तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने माझ्या केसालाही धक्का लागला नाही. मला आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा अथवा काहीही दुर्घटना घडलेली नाही”. कुणीही काळजी करु नये, असं आवाहन राम सातपुते यांनी केलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago