महाराष्ट्र

चिंतेत भर! महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये आढळला ‘निपाह विषाणू’

महाबळेश्वर : महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळल्याची घटना घडली असून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. देशात याआधी काही राज्यात निपाह विषाणू आढळला होता पण महाराष्ट्रात याआधी वटवाघळांमध्ये निपाह विषाणू कधीही आढळला नव्हता. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रजातींच्या वटवाघुळांचे नमुने घेत संशोधन केले होते. हा विषाणू वटवाघूळांमधून मानवाच्या शरिरात संक्रमित होतो, अशी माहिती याबाबत संशोधन करणाऱ्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने निपाह व्हायरसला रोगांच्या यादीत पहिल्या १० मध्येठेवलं आहे. अद्याप निपाह व्हायसरवर कोणतंही औषध किंवा लस नसून तो खूप धोकादायक मानला जातो. याचा मृत्यूदरही अधिक आहे. निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर ६५ टक्क्यांच्या पुढे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते. तसेच कोरोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा आहे.

देशात यापूर्वी २००१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाहचे ६६ रूग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. २००७ मध्ये एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरसने अक्षरशः थैमान घातलं होतं.

निपाहची लक्षणे कोणती?

  1. मानसिक गोंधळ
  2. प्रचंड ताप
  3. डोकेदुखी
  4. स्नायूदुखी
  5. उलट्या
  6. प्रकाशाची भीती वाटणे

प्रसार कसा होतो?

  1. वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यास
  2. संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास
  3. एनआयव्हीचा संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या थेट संपर्कातून
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago