क्राईम

नागपूरमधील ‘ते’ हत्याकांड अनैतिक संबंधातून, पोलीस तपासात समोर आली माहिती

नागपूर : नागपूरच्या गोळीबार चौकातील बागल आखाड्याजवळ काल २१ जून रोजी घडलेल्या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली. एका व्यक्तीने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेहुणीची निर्घृण हत्या करून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आलोक माथुरकर (४५) असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पत्नी विजया (४०), मुलगी परी (१४), मुलगा साहिल (१०), सासू लक्ष्मीबाई बोबडे (५५) आणि मेहुणी अमिषा बोबडे (१९) यांची हत्या केली. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

आलोकने १५ वर्षांपूर्वी विजया यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्याने अमरावती येथे जाऊन बंगाली सूट शिवण्याचा कारखाना टाकला. मात्र, दीड वर्षापूर्वी त्याच्या कारखान्याला आग लागल्यामुळे तो कुटुंबासह नागपुरात परतला. त्याने सासू-सासऱ्यांच्या घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर एक घर भाड्याने घेतलं आणि तो कुटुंबीयासह तिथे राहायला आला. दरम्यान, काही काळाने त्याचे मेहुणीसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर दुसऱ्या तरुणासोबत बोलायचं नाही, असे आलोक अमिषाला सांगू लागला. त्यातून त्यांच्यात खटके उडायला लागले. नंतर या सर्वाला कंटाळून अमिषाने विजयाला याबाबत सांगितले. त्यामुळे विजयाने नवऱ्याला जाब विचारला. त्यानंतर पत्नीसोबतही त्याचे भांडण वाढत गेले.

दरम्यान, रविवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास त्याने पत्नी विजया आणि दोनही मुलं परी व साहिलची हत्या केली. त्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास सासू-सासऱ्यांच्या घरी जाऊन त्याने सासू लक्ष्मीबाई व अमिषा यांची हत्या केली. त्यानंतर आलोक पुन्हा घरी गेला आणि त्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आलोकचे सासरे देवीदास ड्युटीवरून घरी परतले. त्यावेळी लक्ष्मीबाई व अमिषाच्या अंगावर पांघरूण होते. त्या झोपल्या असाव्यात असे वाटल्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर त्यांनी आंघोळ केली. घरमालकाला भाडे दिले. काही वेळाने ते मुलगी विजयाच्या घरी गेले. तेथे साहिलला हाक मारली असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजारच्या महिलेने खिडकीतून बघितले असता साहिल हॉलमध्ये निपचित पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत तहसील पोलिसांना माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी दार तोडले. त्यांना हॉलमध्ये साहिल तर बेडरूममध्ये विजया, परी यांचे मृतदेह दिसले. आलोकने गळफास घेतलेला दिसला.

या धक्क्यातून सावरत नाहीत तोच देवीदास यांना दुसरा धक्का बसला. घटनेची माहिती देण्यासाठी घरी गेले असता त्यांनी पत्नी व मुलीच्या अंगावरचे पांघरूण दूर केले, तर त्या दोघीनांही मृतावस्थेत पाहून देवीदास यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर पोलिस देवीदास यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी तहसील पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

गतिमंद मुलाच्या चिंतेने ग्रासलेल्या वडिलांनी ‘फादर्स डे’च्या दिवशीच केलं भयंकर कृत्य…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago