महाराष्ट्र

सांगलीतील ‘त्या’ कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या नाही तर हत्या, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…

सांगली : सांगलीत काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत माहिती दिली आहे.

२० जून रोजी म्हैसाळमध्ये वनमोरे कुटुंबातील ९ लोकांचं मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. या घटनेने सांगलीसह संपूर्ण राज्य हादरलं होतं. दरम्यान, एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते, मात्र या प्रकरणात हत्येचा धागा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध देऊन मारल्याचे पोलीस तपासांत समोर आले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलं असून याप्रकरणात १९ आरोपी अटकेत आहे. पोलिसांनी आरोपींवर हत्येच्या कममान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यातील २ आरोपींनी या कुटुंबातील सदस्यांना विषारी औषध दिलं. बाकी गोष्टी तपासात निष्पन्न होती, तपास सुरू आहे.

म्हैसाळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज होता. या सर्वांनी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. पण आता पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली असून या ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे निष्पन्न झाले आहे.

सांगली हादरली! एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्या केल्याची माहिती

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago