नाशिक : पतीने आपल्या १९ वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहराच्या एका रहिवासी भागात ही घटना घडली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून पतीने पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, पोलीस तपासात संपूर्ण सत्य बाहेर आले आणि पतीचे बिंग फुटले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमृताकुमार आणि आरोपी पती विकीरॉय हे सातपूर परिसरात राहत होते. पती बिगारी कामगार आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने आणि महिला गरोदर असल्यामुळे ती आपल्या वडिलांकडून पैसे आणायची. मात्र, या गोष्टीवरून त्यांच्यात कायम वाद व्हायचा. पतीला आपल्या पत्नीच्या वागण्यावर आणि घरी येणाऱ्या जाणाऱ्यांवर शंका आली होती. काही दिवसांपासून त्याच्या मनात संशय निर्माण झाला होता. त्यातूनच आरोपीच्या मनात राग धगधगत होता. २८ फेब्रुवारीआधी एका रात्री ते दोघेच घरात असताना रागाच्या भरात पतीने तिच्यावर हल्ला केला. त्याने पत्नीला गंगापूर रोडलगत असलेल्या शहीद अरुण चित्ते पुलाजवळ नेत तिचा गळा आवळला आणि पत्नीची हत्या केली.
गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडाझुडपात मंगळवारी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून नवऱ्याने पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर आणि ग्रामीण पोलिसांना पाठवले. त्याचे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी तंतोतंत जुळले. मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचं पतीने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…