85-year-old senior citizen drowns in swimming pool
पुणे : ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सूचित घास असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना वानवडीमध्ये बुधवारी (५ मार्च) सकाळी आठच्या सुमारास सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमधील जलतरण तलावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सूचित घास हे सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी ८ वाजता एका तरुणीने तलावात कोणीतरी बुडालेलं असल्याचं पाहिलं. तिने तात्काळ सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना आणि इतर रहिवाशांना त्याबाबत सूचित केले. रहिवाशांनी तत्काळ सूचित घास यांना तलावातून बाहेर काढले आणि नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेवेळी तलावाच्या आसपास कोणीही जीवरक्षक उपस्थित नव्हता, आणि तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील नव्हते. त्यामुळे बुडूनच त्यांचा मृत्यू झाला की इतर कारणांमुळे ते बेशुद्ध पडले होते, याबाबत स्पष्टता नाही. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू होण्याचे कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, ही घटना दर्शवते की जलतरण तलावासारख्या सार्वजनिक ठिकाणी जीवरक्षकाची आणि देखरेखीची तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून असुरक्षिततेच्या परिस्थितीमध्ये तात्काळ मदत मिळू शकेल. सुरक्षा आणि उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज आहे, जेणेकरून अशा घटनांना प्रतिबंध केला जाऊ शकेल.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…