नागपूर

शुद्ध कोळशामुळे प्रदूषण कमी होईल – खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

नागपूर : कोल वॉशरिजमुळे विद्युत प्रकल्पांना शुद्ध व स्वच्छ कोळसा मिळतो. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. त्यासोबतच शुद्ध कोळसा मिळाल्यामुळे वीज निर्मितीमध्ये बचत होणार असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कन्हान जवळील गोंडेगाव कोल वॉशरिजला भेट देऊन पाहणी करताना ते बोलत होते.

आमदार आशिष जायसवाल, मॅगनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम.जे. प्रदीप चंद्रन, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार श्री. सांगोळे, कोल वॉशरिजचे वरिष्ठ महाप्रबंधक वासुदेव गुरवे, देवशर्मा, संचालक अमित अग्रवाल, महाप्रबंधक प्रशांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. खनिकर्म मंत्री भुसे यांनी कोल वॉशरिजची पाहणी करुन तेथील प्रक्रियेबाबत माहिती घेतली. यावेळी कोल वॉशरिजच्या प्रकल्पाविषयी नकाशाची पाहणी केली.

गोंडेगाव येथील कोळसा कोल वॉशरिज मध्ये आणून त्याला शुद्ध व स्वच्छ केले जाते. त्यामधील कार्बन मोनॉक्साईड व नायट्रोजन वेगळे केले जात असल्यामुळे हा कोळसा पर्यावरणपूरक आहे, अशी माहिती देव शर्मा यांनी दिली. त्यासोबतच अपुरा साठा असल्यास उमरेड कोळसा खाणीतून कोळसा मागवून त्यास शुद्ध करुन तो महाजेनको कोराडी व खापरखेड्याला पुरविला जातो. येथील कोळसा शासकीय दरापेक्षा कमी दराने मिळतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago