Celebrate Navratri Festival
कल्याण : कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आम्ही याबाबत कायदेशीर लढाई करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिंदे गटाचे शहर प्रमुख विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर ५४ वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील वादाचे पडसाद दिसत होते. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शिंदे गटातील विश्वनाथ भोईर यांना दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…