Tribute to veteran journalist Ashish Chandorkar from Deputy Chief Minister
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर (वय 44) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने एक चांगला पत्रकार, संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आशिष चांदोरकर यांनी ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले होते. यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता आणि त्यात 2014 पासून सरकारच्या विविध योजनांचे लाभ तळागाळापर्यंत कसे पोहोचले, त्या यशोगाथांचा संग्रह त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थींना भेटून तयार केला होता. त्यांच्या निधनाने एक संशोधकवृत्तीचा पत्रकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…