क्राईम

भयंकर : दारूच्या नशेत केली अनोळखी व्यक्तीची हत्या, अगोदर गळा आवळला नंतर चिरला, मग जिवंत जाळलं

नागपूर : नागपुरात एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी शिवारात एका टॅक्सी चालक तरुणाची आरोपींनी अतिशय निर्घृण हत्या केली. अगोदर आरोपींनी या तरुणाचा गळा आवळला आणि त्याला मृत समजून फेकून दिले. काही तासानंतर तो जिवंतच असल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्या तरुणाचा गळा चिरला आणि तेथून निघून गेले. काही वेळाने ते आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी परत आले असता त्यांना तो तरुण जिवंत असल्याचं आढळलं, त्यावेळी आरोपींनी निर्दयीपणे त्या तरुणाला जिवंतच जाळलं. ही घटना 14 मे च्या पहाटे घडली. अंगद उर्फ बिट्टू कडूकर या टॅक्सी चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील रिधोरा गावात राहणारा टॅक्सी चालक अंगद कडूकर 13 मे रोजी संध्याकाळी दोन मित्रांसह काटोलला गेला होता. तिथे एका बंद झुणका भाकर केंद्रात ते तिघे मद्यपान करत होते. त्यांच्याजवळ अक्षय चिगेरिया, मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी हे देखील मद्यपान करत बसले होते. अंगदचे दोन्ही मित्र काही कामासाठी थोडावेळ तिथून गेले. तेव्हा अंगदचं या तिघांसोबत भांडण झालं.

भांडणामुळे राग अनावर झाल्याने आरोपींनी अंगदचं त्याच्या टॅक्सीमध्येच अपहरण केलं. आरोपींनी टॅक्सीमध्ये अंगदला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी त्याला डोंगरगाव परिसरात घेऊन गेले. बेशुद्ध झालेल्या अंगदला मृत समजून आरोपींनी त्याला सावळी शिवारातील निर्जन ठिकाणी फेकून दिले. अंगदची टॅक्सी निर्जन ठिकाणी उभी करुन तिन्ही आरोपी आपापल्या घरी निघून गेले.

आरोपी अक्षय चिगेरियाने घरी गेल्यानंतर एकाची हत्या केल्याचं त्याच्या पत्नीला सांगितलं. अक्षयच्या पत्नीने तात्काळ दोन मित्रांना बोलावून घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी त्यांना अक्षयसोबत पाठवलं. अक्षयने त्यांना अंगद कडूकरला मारुन फेकल्याचं ठिकाण दाखवलं. तेव्हा अंगद जिवंत होता आणि विव्हळत होता. अक्षयचे मित्र जखमी अंगदला रुग्णालयात नेण्याचा विचार करत होते, तेवढ्यात आरोपी अक्षयने जवळचा चाकू काढून अंगदचा गळा चिरला. हे भयंकर कृत्य डोळ्यादेखत घडल्याने अक्षयसोबत आलेले दोन्ही मित्र घाबरुन तिथून पळून गेले.

अंगदला मेलेला समजून अक्षय तिथून पुन्हा निघून गेला. मात्र अंगदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या विचारातून तीनही आरोपी काही वेळाने पेट्रोल आणि ट्रकचा टायर घेऊन पहाटे पुन्हा घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना अंगद पुन्हा हालचाल करताना दिसला. तेव्हा त्यांनी अंगदच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळून टाकले.

यवतमाळ हादरले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या

पहाटेपर्यंत अंगद घरी न परतल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांना त्याची टॅक्सी एका निर्जन ठिकाणी आढळून आली, त्यात झालेली तोडफोड पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांना सावळी शिवारात अंगदचा पेटवलेला मृतदेह आढळून आला.

काटोल पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर अंगद कडूकरच्या हत्या प्रकरणात अक्षय चिगेरिया, मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी या तिघांना अटक केली. आरोपींनी शाब्दिक वादातून हे क्रूर कृत्य केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मृत अंगद कडूकर आणि आरोपींची कोणतीही ओळख नव्हती. त्यांनी दारूच्या नशेत एका अनोळखी व्यक्तीची निर्घृण हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

धक्कादायक : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली आणि अनर्थ घडला..

पोलिसांनी हलत असलेली रुग्णवाहिका तपासली तर त्यांना धक्काच बसला…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago