Comparing ED and CBI with dogs Sanjay Raut tweeted a caricature
मुंबई : ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात छापे टाकले. मुलुंडच्या एका कार्यालयावर छापा टाकण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त करण्यात आले. यात संजय राऊत वापरत असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावाने घेण्यात आल्या असल्याचं समोर आलं. याप्रकरणी आता ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे.
संजय राऊत आणि श्रद्धा डेव्हलपर्स यांच्यात आर्थिक लागेबांधे असल्याचे सिद्ध झाल्यास ईडी आणखी खोलवर जाऊन चौकशी करु शकते. यासाठी ईडीकडून संजय राऊत यांची कोठडी आणखी काही काळासाठी वाढवून मागितली जाऊ शकते. ही बाब संजय राऊत यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत यांचे बंधू आमदार असलेल्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत.
ईडीने संजय राऊतांच्या घरावर छापा टाकत 1 ऑगस्ट रोजी त्यांना अटक केली. सध्या राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. या प्रकरणी एप्रिल महिन्यात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट, अलिबागमधील भूखंड अशी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. संजय राऊत यांची पुन्हा चौकशी करण्याची शक्यता आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…