Categories: मुंबई

मुंबईत उद्यापासून २०% पाणीकपात

मुंबईत शनिवारपासून (१ ऑगस्ट) २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आज चार लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर पाणी आहे. हे जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या ३४% इतके  आहे. गेल्या वर्षी याच वेळी तलावात १२ लाख ४० हजार १२२ दशलक्ष लिटर पाणी होते. ही तूट लक्षात घेऊन पालिकेनं उद्यापासून मुंबई महानगर पालिका क्षेत्रात २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांआधी झालेल्या पावसामुळे काही तलावं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे धरणातील पाणीसाठी मर्यादित राहिला. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी प्रश्नाला तोंड द्यावं लागणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago