Video shared by Donald Trump after being found corona positive
करोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अनेक देश करोनावरील लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी करोनाबाधितांच्या प्रकृतीत प्लाझ्मा थेरेपीमुळे सुधारणा होत असल्याचं दिसून आलं होतं. भारतातही काही करोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे यशस्वीरित्या उपचार करण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनामुक्त झालेल्या नागरिकांना आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन रेड क्रॉसच्या मुख्यालयाचा गुरूवारी दौरा केला. त्यावेळी त्यांनी करोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं. प्रशासनानं करोना विषाणूवरील उपचार शोधण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. जर तुम्ही करोनामुक्त झाला असाल तर इतरांचं जीवन वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान करा. आपण एकत्रितरित्या या संकटावर मात करू, असं ट्रम्प यावेळी म्हणाले.
करोनाचा सामना करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीची मदत होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. याद्वारे करोनाचा सामान्य रुग्ण ५ दिवस आधीच करोनातून बाहेर येत असल्याचंही समोर आलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४६.२९ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी २२ लाखांपेक्षा अधिक जण करनोमुक्त झाले आहेत. तर अमेरिकेत सद्यस्थितीत २१.९७ लाख सक्रिय केसेस आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…