मुंबई

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सहा वाहने विचित्रपणे एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण आठजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पनवेलच्या एम जी एम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने अनेक वाहने एकमेकांना धडकली. यात एक कार ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने तिचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातामध्ये जीव गमावलेल्यांमध्ये युवक काँग्रेसचे नेते गौरव खरात यांचाही समावेश आहे.

अपघातातील मृतांची नावे :

  • गौरव खरात (वय ३६)
  • सौरभ तुळसे (वय ३२)
  • सिद्धार्थ राजगुरू (वय ३१)
  • मयूर दयानंद कदम

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला MH 46 AR 3877 या कंटेनरने पुढे जाणाऱ्या स्वीफ्ट कारला धडक दिली. त्यामुळे ही कार पुढे जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली. या धडकेमुळे टेम्पो त्याच्यापुढे असणाऱ्या कारवर जाऊन आदळला. अशाप्रकारे दोन कंटेनर, दोन कार, एक ट्रक आणि एक आयशर टेम्पो या गाड्यांचा भीषण अपघात झाला. यावेळी एक कार कंटेनर आणि ट्रकच्या मध्ये सापडल्याने कारचा चुराडा झाला आणि त्यामधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल ,देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलीस दाखल झाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago