Bombay High Court
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बलात्काराच्या खटल्यातील एका आरोपीला या अटीवर जामीन मंजूर केला की पीडित महिला जर एक वर्षाच्या आत सापडली तर त्याने तिच्याशी लग्न करावे. सध्या ही पीडित महिला बेपत्ता आहे. आरोपीने या वर्षाच्या सुरुवातीला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला आश्वासन दिले की तो पीडितेशी विवाह करण्यास आणि मुलाचे पितृत्व स्वीकारण्यास तयार आहे. दरम्यान, सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की पीडित महिला सापडत नसून तिचे बाल संगोपन केंद्रात दाखल करण्यात आलेले मूल आधीच दत्तक देण्यात आले होते.
गुन्ह्याची नोंद झाली त्यावेळी पीडित मुलगी ही १८ वर्षांवरील होती आणि हे लैंगिक संबंध सहमतीने प्रस्थापित झाले होते हे लक्षात आल्यानंतर एकल न्यायाधीश भारती डांगरे यांनी एका वर्षाच्या आत पीडित व्यक्ती सापडल्यास आरोपी तिच्याशी लग्न करेल, या अटीवर अर्जदाराची जामिनावर सुटका करणे योग्य मानले. तथापि, न्यायाधीशांनी हेदेखील स्पष्ट केले की एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती त्याच्या म्हणण्याला बांधील राहणार नाही.
न्यायालयाने आदेशात म्हटले कि, “अशा परिस्थितीत जेव्हा ही घटना घडली तेव्हा पीडित मुलगी १८ वर्षांवरील (मोठी) होती आणि तिने आधीच सांगितले आहे की हे संबंध तिच्या संमतीने होते आणि अर्जदार आणि त्याच्या कुटुंबाच्या वतीने एक विशिष्ट विधान केले गेले होते की ते लग्न समारंभ करण्यास तयार आहेत. परंतु, सध्या पीडित मुलीचा शोध लागत नाही, पीडित मुलीचा अल्पावधीत आणि एक वर्षाच्या कालावधीत शोध लागल्यास तो तिच्याशी विवाह करील, याचे पालन करून अर्जदाराची जामिनावर सुटका करणे मला योग्य वाटते, परंतु तो एका वर्षापेक्षा अधिक काळ विधानास बांधील राहणार नाही.”
काय आहे प्रकरण?
कोर्टाने तक्रारीवरून नमूद केले की, आरोपी आणि पीडितेची 2018 मध्ये ओळख झाली आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही कुटुंबातील सदस्यांनीही त्यासाठी होकार दिला. दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये ती 6 महिन्यांची गर्भवती असल्याचे तिला आढळले. याबाबत तिने आरोपीला माहिती दिल्यानंतर त्याने संपर्क साधण्यास टाळाटाळ केली आणि तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिने त्या व्यक्तीवर बलात्कार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.
अर्जदाराने प्रतिसाद न दिल्यामुळे, पीडितेने घरापासून दूर जाऊन एका मुलाला जन्म दिला आणि मुलाला दुसऱ्या व्यक्तीच्या आवारात सोडले. तिथून कोणीतरी मुलाला केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्यानंतर, तिच्यावर मुलाला सोडून दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला, जे कदाचित तिच्या पळून जाण्याचे कारण असू शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीची जामिनावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…