मुंबई

अनिल देशमुख यांची ईडीविरोधात याचिका, समन्स रद्द करण्याची मागणी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र या याचिकेच्या वैधतेवरच केंद्र सरकारनं जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या याचिकेची सुनावणी खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केंद्र सरकारतर्फे सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी केली. ते म्हणाले की याचिका एकलपीठापुढे मांडली जाऊ शकत नाही, या याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी व्हायला हवी.

याचिकाकर्ते मात्र ही याचिका कायदेशीरदृष्ट्या सक्षम असून कायदेशीरदृष्ट्या ती एकलपीठापुढेच ऐकली जावी यावर ठाम आहेत. यावर दोन्ही बाजूंचा प्राथमिक युक्तिवाद ऐकल्यानंतर या याचिकेवर सुनावणी घ्यायची की खंडपीठाकडे वर्ग करायची यावर आपला निकाल उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत राखून ठेवला.

प्रकरण प्रलंबित असताना, तपासयंत्रणा अवाजवी खळबळ निर्माण करत आहेत, नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि महत्वाची कागदपत्रं आणि माहिती लीक करत आहेत असा आरोप अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. अनिल देशमुखांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचं देशमुखांच्या वतीने सांगण्यात आलं. तपासयंत्रणा चौकशीची गरज कशासाठी आहे?, याची माहिती देत नाही. तपासयंत्रणेनं अद्याप ECIR ची कॉपी दिलेली नाही, तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देशमुख यांच्यावतीने करण्यात आला.

अनिल देशमुखांची यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रलंबित आहे, अशी माहिती ईडीच्यावतीने एएसजी अमन लेखी यांनी उच्च न्यायालयाला दिली. मात्र या दोन्ही याचिकांमधील मागण्या वेगळ्या आहेत असा युक्तिवाद देशमुखांच्यावतीनं त्यांचे वकील विक्रम चौधरी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आम्ही सरसकट या प्रकरणाला आव्हान दिलंय, मात्र हायकोर्टात आम्ही ठराविक मुद्यांसाठी आलो आहोत. अनिल देशमुखांना तातडीने दिलासा मिळण्याची गरज आहे, असं देशमुखांच्यावतीने सांगण्यात आलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago