guidelines issued on the occasion of Public Ganeshotsav 2021
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यातच आता पुण्यातही उद्यापासून जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत कलम १४४ लागू असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात दक्षता म्हणून तब्बल सात हजार पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, लोक बाहेर पडणार नाहीत आणि बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी पोलिसांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी स्वतः शिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलिस आयुक्तांनी केलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…