मुंबई

मुंबईतील 16 मजली इमारतीमध्ये भीषण आग, 11 जणांची सुखरूप सुटका

मुंबई : उत्तर मुंबईतील 16 मजली निवासी इमारतीमध्ये रविवारी लागलेल्या आगीतून 11 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. बोरीवली उपनगरात असलेल्या ‘धीरज सवेरा’ इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला रात्री 12.25 च्या सुमारास देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या 14व्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये आग लागली होती, त्यामुळे त्यातील घाबरलेल्या रहिवाशांनी स्वतःला वाचवण्यासाठी 15व्या मजल्यावर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सात गाड्या, आठ जंबो टँकर, रुग्णवाहिका आणि इतर मदत घटनास्थळी रवाना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले कि, आग लागलेल्या फ्लॅटमधील तीन महिला आणि इतर आठ लोकांना इमारतीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सकाळी 6.30 च्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago