क्रीडा

अभिमानास्पद! नीरज चोप्राने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवून मोसमातील पहिले सुवर्णपदक जिंकले

Kuortane Games : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावणारा अ‍ॅथलीट नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. शनिवारी रात्री ऑलिम्पिकनंतर त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले. भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 86.69 मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले आणि सुवर्णपदक जिंकले.

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर थ्रो केला होता. त्याचा दुसरा थ्रो फाऊल झाला होता. तिसर्‍या थ्रोवेळी तो घसरलादेखील होता. यानंतर तो पुढच्या 2 प्रयत्नासाठी मैदानात उतरला नाही, पण इतर कोणताही खेळाडू त्याला आव्हान देऊ शकला नाही. नीरज चोप्रा 10 महिन्यांनंतर स्पर्धेत उतरत आहे. अशा परिस्थितीत त्याला कोणतीही कसर सोडायची नाही आणि हे सुवर्णपदक त्याच्या मेहनतीचे फळ आहे.

याच महिन्यात नीरज चोप्राने पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम केला. तो ९० मीटरचा टप्पा गाठेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती पण त्याला तसे करता आले नाही. नीरज चोप्राने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशोर्न वॉकटला मागे टाकले आहे. वॉलकॉटला केवळ 86.64 मीटर थ्रो करता आला. त्याचबरोबर सध्याचा जगज्जेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स याने ८४.७५ मीटरसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारताच्या संदीप चौधरीला केवळ 60.35 मीटर थ्रो करता आला. तो 8 व्या क्रमांकावर होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago