मुंबई

अनिल देशमुख यांनी दिलेली सर्व कारणे बाजूला सारत ED ने बजावले तिसरे समन्स

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) तिसरे समन्स बजावले आहे. देशमुख यांना ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख या आधी दोन समन्म मिळूनही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नव्हते. माझे वय झाले असून मला काही आजार असल्याने आपण ईडीच्या कार्यालयात येऊ शकणार नाही. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीसाठी मी तयार आहे, असेही देशमुख यांनी ईडीला कळवले होते.

ईडीने देशमुख यांना २५ तारखेला पहिले समन्स बजावले होते. त्यानंतर दुसऱ्या समन्सनंतर त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहिले होते. मात्र, आता देशमुख यांनी ईडीला हजर न होण्याची दिलेली सर्व कारणे बाजूला सारत ईडीने देशमुख यांना तिसरे समन्स बजावले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी माजी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचीही ईडीने चौकशी केली होती. अनिल देशमुखांनी पैशांचा गैरवापर केल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ईडीने देशमुख यांच्या घरावर तसेच त्यांच्या संबंधितांच्या घरावर छापे टाकले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago