महाराष्ट्र

ब्रेकिंग : विक्रोळीजवळ 1800 किलो गांजा जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करणाऱ्या गँगचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मुंबईत काहीजण गांजा पोहोचवत असल्याची माहिती मिळाली होती. घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एक ट्रक अडवली.

अडवलेल्या ट्रकमध्ये नारळ भरलेले होते. आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवली होती, त्यात त्यांनी 1800 किलो गांजा लपवला होता. या जप्त केलेल्या गांजाची किंमत जवळपास साडे तीन कोटी रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी ट्रकमध्ये असलेल्या आकाश यादव आणि दिनेश सरोज या दोघांना अटक केली आहे. आकाश यादवविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत.

ओडिशातून आंध्रप्रदेशमार्गे हा गांजा मुंबईत आणला जाऊन गोदामात साठवला जाणार होता. तिथून तो मुंबईतील वेगवेगळ्या भागात डिस्ट्रिब्युट करण्यात येणार होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago