महाराष्ट्र

मनोज जरांगेची तब्येत खालावली; बीपी अन् शुगरही कमी; डॉक्टरांकडून तपासणी, उपचाराचा सल्ला

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैपासून पुन्हा आमदार उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा ४ था दिवस आहे. सोमवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा केला, पण मराठा आरक्षणावर ते काहीही बोलले नाहीत, त्यावरुन त्यांनी शाह यांच्यावर टीका केली होती. तर, मंत्री छगन भुजबळ यांनाही इशारा देत, पुढचं उपोषण हे येवल्यात येऊन सुरू करेल, असे जरांगे यांनी म्हटले होते. आता, उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली असून जालन्यातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक त्यांच्या सेवेसाठी घटनास्थळी दाखल आहे. त्यानुसार, मनोज जरांगे यांचा बीपी व शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची जालन्यातील वैद्यकीय पथकाकडून आज दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली. उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची शुगर कमी झाली असून रक्तदाबही खालावला आहे. मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. राजेंद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आम्ही मनोज जरांगे यांची तपासणी केली. सुरुवातीला त्यांचा बीपी १७०/१७४ असायचा. पण, आज त्यांचा रक्तदाब कमी झाला असून ९६/६८ एवढा बीपी आहे. त्यांची शुगरही कमी झाली आहे. डॉक्टर म्हणून त्यांच्यावर उपचार करणे माझं काम आहे, त्यांनी उपचार घ्यावे यासाठी आम्ही त्यांना विनंती करत आहोत, आमची टीम इथे त्यांच्यासाठी कार्यरत आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 तास ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago