beed patoda bus stand student while climbing through the window broke
बीड : बसमध्ये धक्का लागणे, गर्दी असणे हे इथल्या लोकांसाठी नॉर्मल गोष्ट आहे. कधी कधी बसची वाट पाहत असताना कित्येक तास निघून जातात, हे कधी समजतही नाही. कधी-कधी गर्दीत चढताना आपल्याला अपयश येतं. बस उशिरा आल्यानंतर त्यामध्ये अधिक गर्दी असते. त्यामध्ये काही लोकं लटकून प्रवास करतात किंवा काही लोकं बसमध्ये उभं राहून जाणं पसंत करतात. सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक मुलगा बसमध्ये चढण्यासाठी कशाप्रकारे जुगाड करत आहे, हे व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झालं आहे.
स्थानकात बस येताच सीट पकडण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडताना आपण अनेक वेळा पाहतो. असाच प्रकार बीडच्या बस स्थानकात पाहायला मिळाला. पाटोदा बस स्थानकात सीट पकडण्याच्या नादात एक तरुण प्रवासी खिडकीतून बॅग सीटवर ठेवतो. त्यानंतर दरवाजातून न जाता तो तरुण खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतानाच चक्क खिडकीसह जमिनीवर कोसळला. हा सर्व प्रकार बाजूला उभी असलेल्या बसमधून एका प्रवाशाने मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…