महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट, ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा अशी मागणी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेतेही होते. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर फ्लोर टेस्टची मागणी केली.

मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. राजभवनातून बाहेर आल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांना माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यपालांना आज ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्याची आताची परिस्थिती आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. याचा साधा अर्थ आहे, ते ३९ आमदार सरकारसोबत नाहीत. त्यामुळे सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाहीय. सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, यासाठीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलेलं आहे.

या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा उल्लेख केला आहे. या पत्रावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. मेजॉरिटी सिद्ध करण्यासाठी योग्य ते निर्देश देतील अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार असं भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर गेलं होतं.

आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या महाराष्ट्र युनिटची कोअर कमिटीची बैठक पार पडली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचे समजते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago