काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला.
किडनीच्या विकाराने त्यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या एका खाजगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.
अत्यंत शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. तसंच अभ्यासू नेत्यांपैकी एक अशी त्यांची ख्याती होती. स्वातंत्र्यलढ्यात देखील शिवाजीराव पाटील सहभागी होते. ते 1985 ते 1986 दरम्यान मुख्यमंत्री होते. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कारभार सांभाळला होता.
आज निलंग्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली पाळून त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…