देश

राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ माजली आहे.

राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर बोलताना ओवैसी म्हणतात की, बाबरी मशीद तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहिल. तसेच बाबरी मशीदचा जुना फोटो टाकताना त्यांनी ‘बाबरी जिंदा है’ (#BabariZindaHai) या हॅशटॅगचाही वापर केला आहे.

धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया असून मोदींनी भूमीपूजन समारंभात सहभागी होणं हे त्यांच्या संविधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं मत ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलं होतं. बाबरी ही मशीद असून ती कायम राहणार आहे. ही माझी श्रद्धा असून त्यापासून मी किंवा इतर कुणीही पळ काढू शकत नाही. मशीदीत 1949 मध्ये गुप्तपणे मूर्ती ठेवण्यात आली होती. यानंतर 1992 मध्ये मशीद पाडण्याची घटना घडली आहे. आम्ही नव्या पिढीला सांगतच राहू की, आपली मशीद पाडण्यात आलीय, असंही औवैसींनी यावेळी सांगितलं होतं.

मात्र भूमिपूजनाला काहीच तास शिल्लक असताना ओवैसींनी केलेल्या ट्विटनं वातावरण चांगलंच तापलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago