स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी व प्रतिलिटर अनुदान देण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूधपावडर आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात पहाटेपासून सुरुवात झाली. पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. सांगलीतील राधानगरी तालुक्यातील शिरसे गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाची नासाडी नको म्हणून गावातील नागरिकाना दूध वाटप केले.
पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 दर आणि प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देण्याची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली.
सोलापूरातील बार्शी तालूक्यातील जवळगाव गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाईला दूधाचा अभिषेक घालून आपला निषेध व्यक्त केला. राज्य सरकारने दूध उत्पादकांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवाव आणि दूधाला भाव वाढवून मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज नागरिकांना संकलन केलेल्या दुधाचे वाटप करण्यात आलं. नाशिकमध्ये चिंचखेड गावातील शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालत आंदोलन करण्यात आलं. तर नगरमधील अकोले तालुक्यात दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…