महाराष्ट्र

अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डबा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अनिश्चित काळासाठी विस्कळीत

अंबरनाथ : अंबरनाथ स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने होतं आहे. रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.जो डबा रुळावरून घसरलेला आहे,त्याला वेगळं करून घसरलेल्या डब्याला लिफ्ट करून पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. सध्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अनिश्चित काळासाठी विस्कळीत झाला आहे.

पुण्याला जाणाऱ्या अनेक महत्वाच्या गाड्या या मार्गावरूनच धावत असतात, परंतु, या अपघातामुळे पुण्याकडून येणारी आणि पुण्याला जाणारी  वाहतूक अनिश्तिच काळासाठी विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेचा हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. कल्याण ते कर्जत दरम्यानच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. बदलापूर लोकल उल्हासनगर स्थानकावर थांबवण्यात आली आहे.

तसेच ट्रेन १८५२० विशाखापट्टणम एक्सप्रेसही अंबरनाथ स्थानकावरील सिग्नलवर थांबवण्यात आली आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, संपूर्ण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. रुळावरून घसरलेला डबा रुळावर आणून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago