महाराष्ट्र

रश्मी शुक्लांना महाराष्ट्रात परत आणण्याच्या हालचालीना वेग, महत्त्वाच्या पदावरही वर्णीही लागणार?

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे आता रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्रात फक्त परत आणले जाणार आहे तसेच त्यांची वरिष्ठ पदावर वर्णीही लागले अशी जोरदार चर्चा सुरु आहे. या संभाव्य निर्णयाबद्दल राज्यातील पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यानंतर संबंधित प्रकरणाचा तपास पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावरील सर्व कलंक आता दूर झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांनी मोहित कंबोज यांच्यासोबत सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे दिवस पालटणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

काय होत नक्की प्रकरण?
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राने ऐतिहासिक असे राजकीय नाट्य अनुभवले होते. शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हे सर्व राजकीय नाट्य तब्बल ३६ दिवस सुरु होते. या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होता. गुप्तवार्ता विभागाने रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत, त्यांची बनावट नावं सांगून, हा सगळा उद्योग करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या.

आरोप झाल्यानंतर रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये निघून गेल्या. परंतु, महाविकास आघाडी सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी हे प्रकरण मुंबई सायबर सेलकडे सोपवले होते. या सगळ्या चौकशीला रश्मी शुक्ला यांनी अपेक्षित सहकार्य केले नव्हते. त्या चौकशीसाठी मुंबई यायला तयार नव्हत्या. मी पत्रव्यवहाराद्वारे उत्तरे देईन, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर सायबर पोलिसांचे पथक हैदराबादलाही गेले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांना अटक होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंगचे गंडांतर दूर झाले आहे. एवढेच नव्हे तर केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्रात ‘घरवापसी’ होण्याची दाट शक्यता आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago