महाराष्ट्र

कवठेमहांकाळ एस.टी. आगारात १८ एस.टी. बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली : सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्त्वाचा घटक आहे. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी कवठेमहांकाळ आगारासाठी नवीन 18 एस.टी.बसेस देण्यात आल्या असून या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कवठेमहांकाळ बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खासदार संजय पाटील, तहसिलदार अर्चना कापसे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, कवठेमंकाळ आगार व्यवस्थापक आश्विनी किरगत, वाहतूक निरीक्षक अजिंक्य पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक शाहिद भोकरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अजितकुमार गोसराडे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी या नवीन प्राप्त झालेल्या बसेस उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

6 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago