महाराष्ट्र

नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे. नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकन संदर्भात कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, मुंबई, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड या विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे महत्वाचे आहे. परंतु, काही महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकन केले जात नाही. याबाबत संबंधित विद्यापीठांनी नॅक मूल्यांकनासाठी स्थानिक पातळीवर अशा महाविद्यालयांच्या काय अडचणी आहेत, याबाबत पडताळणी करावी आणि नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया रोखणे, महाविद्यालयांची संलग्नता रद्द करणे अशी कारवाई सुरू करावी, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी केल्या.

नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया सहज, सुलभ व्हावी त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय नॅक मूल्यांकनसाठी पुढे येतील, असे बैठकीत कुलगुरू यांनी सांगितले. याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत कळविण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

6 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago