महाराष्ट्र

विविध देशांमधील भारताच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट, चार मराठी भाषिक राजदूतांचा शिष्टमंडळात समावेश

मुंबई : विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ राजदूत व उच्चायुक्तांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन आपल्या कार्याची माहिती दिली. शिष्टमंडळामध्ये चार मराठी भाषिक राजदूतांचा समावेश आहे.

भारताच्या कंबोडियातील राजदूत डॉ. देवयानी खोब्रागडे, जकार्ता येथे मुख्यालय असलेल्या एसियान दूतावासातील भारताचे राजदूत जयंत खोब्रागडे, चेक गणराज्यातील भारताचे राजदूत हेमंत कोटलवार, इराक येथील भारताचे राजदूत प्रशांत पिसे, चिली येथील भारताचे राजदूत सुब्रत भट्टाचारजी, केमरुन येथील उच्चायुक्त आनिंद्य बॅनर्जी, मलेशियातील उच्चायुक्त बी. एम. रेड्डी व बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय कुमार वर्मा यावेळी उपस्थित होते.

राजदूत व उच्चायुक्तांची त्यांची पदस्थापना असलेल्या देशाचे भारताशी संबंध, शैक्षणिक सहकार्य, त्या देशांमधील भारतीयांची स्थिती, संबंधित देशांसोबत भारताचे व्यापार-वाणिज्य व सांस्कृतिक संबंध याबाबत राज्यपालांना माहिती दिली. कंबोडिया येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जगातील सर्वात मोठ्या अंकोर वाट येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य भारत युनेस्कोच्या माध्यमातून करीत असून भारत व कंबोडियामध्ये थेट विमानसेवा सुरु झाली. तर, त्यातून पर्यटन, आर्थिक तसेच सांस्कृतिक सहकार्य वाढेल, असे डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी सांगितले. मुंबई व सिंहानूक शहरांमध्ये भगिनी – शहरे करार व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच आसियान देशांमध्ये भारतीय संस्कृतीची ठळक छाप असल्याचे राजदूत जयंत खोब्रागडे यांनी सांगितले.

भारताच्या विविध देशांमधील दूतावासांचे प्रमुख केवाडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या वार्षिक परिषदेत भाग घेण्यासाठी भारतभेटीवर आले आहेत.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago