महाराष्ट्र

‘समग्र रायगड’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : रायगड जिल्ह्याची माहिती देणाऱ्या ‘समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन झाले. यावेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण’ या कॉफी टेबल बुकमध्ये प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे – गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक – धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग – कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशी उपयुक्त माहिती आहे. बुक निर्मितीमध्ये रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व मीडिया आर अँड डी दिलीप कवळी यांनी सहभाग घेतला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago