Four killed in road accident near Pandharpur
पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही बोलेरो थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन महिला एक पुरूष आणि एक लहान मुल अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात सकाळी सहा वाजेच्या सुमारास कासेगाव परिसरात घडला. कोल्हापुरातील चंदगड येथील 16 भाविक बोलेरो गाडीतून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येत होते. पंढरपूरच्या जवळ असतानाच कासेगाव जवळच्या रस्त्यावर बोलेरो गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला जाऊन जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की, बोलेरोचा चेंदामेंदा झाला. जखमींना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…