महाराष्ट्र

बापाने केला पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, मुलीने ‘अशाप्रकारे’ शिकवला धडा

चंद्रपूर : बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूर शहरात हे संतापजनक प्रकरण समोर आले आहे. घरात मुलगी एकटी असताना तिच्या बापाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रसंगावधान राखत मुलीने बापाला बाजूला ढकलून घरातून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर मुलीने वडिलांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात हे चार जणांचे कुटुंब राहते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. ही मुलगी दहावीनंतर आईसोबत घरकाम करण्यासाठी जायची. तिचे वडील कोणतेही  काम करत नाहीत. हा बाप आपल्याच मुलीवर वाईट नजर ठेवत होता. अशातच काही महिन्यांपूर्वी एक दिवस घरात मुलगी एकटीच होती. तिला एकटीला बघून नराधम बापाने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने तिच्या बापाला धक्का देऊन दूर ढकलले आणि घराबाहेर पळ काढला. तिने या घटनेबद्दल आईला सांगितले. त्यानंतर या नराधमाला घराबाहेर काढण्यात आले होते.

या घटनेनेनंतर तीन महिन्यांनी बापाने घरी फोन केला आणि अपघात झाल्याचे सांगत त्याला घरात घेण्याची विनंती केली. तसेच माफी मागत यापुढे असा प्रकार होणार नाही असे देखील सांगितले. मात्र, पुन्हा काही दिवसांनंतर या बापाने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा विनयभंग केला, त्यामुळे अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून शुक्रवारी या मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन वडिलांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला असून संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मुलीच्या या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago