Chance of rain and hail in some places in the state
मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आजही मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
आज मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना देखील हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील चोवीस तासांत या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून वेगवान वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…