महाराष्ट्र

कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांची हजेरी, लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयतेने हत्या केली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींना फाशी दिली जावी, या मागणीसाठी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलनं झाली होती. अखेर न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता या घटनेला आठ वर्षे झाली आहेत. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं, आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विवाह सोहळ्याला हजर होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विवाहाचं निमंत्रण आलं होतं, म्हणून मी कोपर्डीत आलो. वधू-वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंबं एकत्र येत आहेत आणि सर्व लोक वधू-वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत.”

दरम्यान, शनिवारी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर भाष्य करत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली तरी त्यांना फक्त 16 जागा मिळाल्या, तर शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मतं मिळाली, पण त्यांना 57 जागा मिळाल्या. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी जनतेचं ऐकावं, कार्यकर्त्यांच्या खोट्या बोलण्याचं ऐकू नये. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पराभव स्विकारला पाहिजे. पवार साहेबांनी जनतेचं मत स्वीकारलं पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल, अशा प्रकारची वक्तव्यं किमान शरद पवार यांनी तरी करू नयेत. पवार साहेबांना माहीत आहे, पराभव नेमका कशामुळे झाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago