देश

नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचा धक्कादायक प्रकार: अविवाहित तरुणाला दारू पाजून शस्त्रक्रिया

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि त्याची नसबंदी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

गोविंद दंतानी नामक 30 वर्षीय तरुणाने आपबिती सांगितली. तो शेतात काम करत असताना एक आरोग्य कर्मचारी त्याच्याकडे आला. त्याने गोविंदला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर बोलावले आणि 500 रुपये रोज देण्याचं आश्वासन दिलं. गोविंद त्यासाठी तयार झाला. त्याला लगेच कारमध्ये बसवून, आरोग्य कर्मचाऱ्याने त्याला 100 रुपयांची दारू पाजली. दारूच्या नशेत असताना, त्याला सरकारी रुग्णवाहिकेतून गांधीनगरजवळ असलेल्या अदलज येथील रुग्णालयात नेलं आणि त्याच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली. शुद्धीवर आल्यावर गोविंदला या प्रकाराची माहिती मिळाली.

त्याच्या पोटात वेदना होऊ लागल्यावर, गोविंद डॉक्टरकडे गेला आणि तिथे त्याला कळलं की त्याची नसबंदी झाली आहे. या घटनेमुळे गोविंदच्या लग्नाची तयारी धुडकली, कारण त्याची लग्नासाठीचे नातेवाईक वधू पक्षाशी संबंध तोडले.

हा प्रकार, कुटुंब नियोजन पंधरवाडा साजरा असताना, टार्गेट पूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्य कर्मचार्‍यांनी केला असल्याचा आरोप आहे. मेहसाना जिल्ह्यात 175 नसबंदी ऑपरेशन करण्याचं टार्गेट ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणावर जिल्हा आरोग्य अधिकारी आरोप फेटाळत असले तरी, टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशी कार्यवाही करणं हे गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago