महाराष्ट्र

ईडीकडून एकनाथ खडसे यांना नोटीस; मालमत्ता १० दिवसांत रिकाम्या करा, नाहीतर…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा ताबा तातडीने सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या १० दिवसांमध्ये या सर्व मालमत्ता शांततेत रिकाम्या करा, असे ईडीकडून (ED) बजावण्यात आले आहे. ईडीचे उपसंचालक अमित भास्कर यांनी ही नोटीस जारी केली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यातंर्गत २५ ऑगस्ट २०२१ रोजी एकनाथ खडसे व मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, इन्सिया मुर्तझा बदलावाला आणि उकानी यांच्या वैयक्तिक तसेच संयुक्त मालकीच्या ११ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या होत्या.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. या मालमत्तेचे एकूण मूल्य ५ कोटी ७५ लाख इतके आहे. यामध्ये लोणावळ्यातील बंगला, जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे. ही मालमत्ता १० दिवसांत खाली करावी, असे ईडीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसे न केल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या केल्या जातील, असा इशाराही ईडीने दिला आहे. तसेच संबंधित मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी देऊ नये, असेही नोंदणी महानिरीक्षक आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. या मालमत्तांचे २५ मे २०२२ रोजी ॲडज्युडिकेशन झाल्यानंतर ३० मे रोजी या मालमत्ता रिकाम्या करण्याची नोटीस ईडीने जारी केली. या नोटिशीनुसार, या जागा रिकाम्या झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईपर्यंत या मालमत्ता पूर्णपणे ईडीच्या ताब्यात राहतील.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago