ग्लोबल

अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना, तुलसा मेडिकल बिल्डिंगमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण ठार

अमेरिका : अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या हत्याकांडानंतर आता ओक्लाहोमामध्येही गोळीबाराची घटना घडली आहे. हॉस्पिटल कॅम्पसमधील तुलसा मेडिकल बिल्डिंगमध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. कॅप्टन रिचर्ड मेलेनबर्ग यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली. गोळीबार करणाराही मृत झाल्याचे मेलेनबर्ग यांनी सांगितले. मेलेनबर्ग यांनी असेही म्हटले आहे की अनेक लोक जखमी झाले आहेत आणि वैद्यकीय संकुलमध्ये एक “आपत्तीजनक दृश्य” आहे.

पोलिसांनी संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे कि, अधिकारी सध्या इमारतीतील प्रत्येक खोलीतून अतिरिक्त धोक्यांची तपासणी करत आहेत. आम्हाला माहित आहे की तेथे अनेक जखमा आहेत आणि संभाव्यत: अनेक बळी आहेत.”

म्यूलेनबर्ग म्हणाले की, अधिकारी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत “काही लोकांना गोळ्या घातल्या गेल्याचे त्यांना आढळले. एक जोडपे आधीच मरण पावले होते.” ते म्हणाला, “आम्हाला तो शूटरही मृत आढळला. आम्ही त्याला शूटर मानत आहोत कारण त्याच्याकडे एक लांब रायफल आणि एक पिस्तूल होती. संशयित हल्लेखोर व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.

आठ दिवसांपूर्वी टेक्सासमधील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये स्वयंचलित रायफलने सशस्त्र 18 वर्षीय बंदुकधारी व्यक्तीने हत्याकांड घडवून आणले आणि 19 मुले आणि दोन शिक्षकांना ठार मारले होते. त्यामुळे अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहील आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago